चंदेरी दुनियेतील काही व्यक्तिरेखा मनात अगदी घर करून बसतात. त्या त्या व्यक्तिरेखेला त्या सिनेमाच्या कथानकाचा संदर्भ असतो पण आपल्या आयुष्याच्या कुठल्यातरी कंगोऱ्यास ती व्यक्तिरेखा किंवा तिची एखादी कृती स्पर्शून जाते. गेलेल्या घटनांची स्मृती चाळवते किंवा अगदी कसोटीच्या क्षणी हात ही देते -- बरेच पैलू आपण स्वतः किंवा माहितीतल्या कोणाची तरी आठवण करून देतात. एखादे चांगले पुस्तक, जीवश्च मित्र-मैत्रिणीला भेटल्यावर झालेला आनंद, मस्त शांत फिरून आल्यावर मिळणारा निवांतपणा आणि आवडलेली व्यक्तिरेखा -- जीवन सुकर, समृध्द करणाऱ्या साध्या गोष्टी. खूप वेळा संदर्भ, नाव लक्षात राहत नाही पण सिनेमातल्या एखाद्या प्रसंगाची छबी मनावर कोरलेली असते, शब्द आठवत नाहीत पण छोटीशी लकेर, कटाक्ष अशा छोट्या गोष्टी मध्येच आठवतात. आवडणारे सिनेमे खूप - सगळ्यांचीच यादी नाही करता येत पण स्मरणात राहिलेल्या काही व्यक्तिरेखा आणि अभिनयासाठी नायिकान्बद्दल थोडेसे. ही यादी परिपूर्ण नाही आणि यातल्या प्रत्येक भूमिकेबद्दल एक मोठा लेख होईल. पण सुरुवात करायला हवी कुठेतरी म्हणून आता संक्षिप्तात-- पुढे कदाचित वाढवेन.
रंग दे मधली वहिदापण छानच -- तिच्या जुन्या सिनेमातील भूमिका बघितल्या की तिच्याइतकी इतकी graceful अजून कोणी नाही.
श्याम बेनेगलचा हरी भरी ग्रामीण मुस्लिम कुटुंब आणि मुख्यतः कुटुंब नियोजानासारख्या प्रश्नावर पण अतिशय वास्तवदर्शी असा सिनेमा यात नंदिता दासची अल्लड छोट्या जावेची भूमिका, नवऱ्याने ऑपरेशन कारण आला म्हणून रुसून घर सोडून जाणारी आणि मध्येच थबकून परत येणारी हा प्रसंग गोडच. बांद्र्याच्या थिएटरात बघायला गेलो होतो तेव्हा सगळ्या बायकाच होत्या आत.
ERIN brokovich मधली आणि Notting Hill जुलिया roberts . Runaway Bride धमाल --
स्त्री
हजारो ख्वाइशे ऐसी मधली चित्रांगदा, साठीच्या दशकातील विद्यार्थी आंदोलनाचा कॉलेजात असलेला प्रभाव, तिचं उच्चवर्गीय राहणीमान, आंदोलनातल्या मित्रावर जीव तोडून प्रेम, त्याच्यासाठी सुखाचा संसार सोडून त्याच्या कामात झोकून देणे आणि नंतर तो सोडून गेला तरी ते काम सुरु ठेवणे. अतिशय बोलका अभिनय आणि त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून जाणाऱ्या अनेक आव्हानांना तोंड देत तोंड देत अल्लड मुलगी, असहाय्य प्रेमिका आणि एक प्रगल्भ स्त्री असा प्रवास तिने सुंदर दाखवला होता.
समय मधली सुश्मिता सेन -- ही वाटली होती IB officer
फिर भी दिल हिंदुस्तानी मधली काहीही करून टॉपला राहणारी वार्ताहर जुही आणि तीन दिवारे मधली जुही -दोन वेगळ्या व्यक्तिरेखा. तीन दिवारेमध्ये जेव्हा नवरयाला आता यापुढे असा अत्याचार करत राहिलास तर तू झोपलेला असताना जाळून टाकेन असं धमकावणारी आणि आपल्या बहिणीच्या खुनाचा अतिशय थंड डोक्याने तपास लावणारी पण त्याचबरोबर तुरुंगात घडणाऱ्या चांगल्या कामाला हातभार लावणारी. संवेदनशील पण करारी जुही आवडली होती.
लज्जा मधली मनीषा आणि माधुरी दोघी - रस्त्याच्या कडेला लघवीला बसणारी, शीळ घालणारी आणि रंगमंचावर प्रियकराला जाब विचारणारी माधुरी अफलातूनच होती. देढ ईश्कीया बघायचाय अजून . खामोशीमधली मनीषा
कहाणी, नोवन किल्ड जेसिका, डर्टी पिक्चर, पा, ईश्कीया मधली विद्या बालन. ईश्कीय मध्ये ती नसरुद्दिनला खड्सावते -- कौन हो तुम मेरे पती, यार … तो प्रसंग आणि अगदी थंड डोक्याने निर्णय घेणारी, दोघां मामू भातीज्यांच्या प्रेमात आपल्याला हवे तेच शोधणारी ।
सुमित्रा भावेने चाकोरी म्हणून एक छोटी फिल्म केली होती -- त्यात काम केलेली मुलगी आणि व्यक्तिरेखा. नवऱ्याने टाकून दिलेली मुलगी, छोट्या भावाच्या मदतीने सायकल शिकते व गावात चाललेल्या कामात सहभागी होते. छोटीशी पण त्या मुलीची जिद्द दर्शवणारी आणि सायकल शिकणे ह्या छोट्या गोष्टीमुळे तिच्या आयुष्यात किती फरक आला- शेवटच्या प्रसंगात ती सायकल चालवताना सायकलीचे फिरणारे चाक आणि त्याचवेळेस तिच्या पायातले पडणारे पैंजण/ साखळी असा सुरेख शेवट अजून डोळ्यासमोर दिसतो.
डोर मधली गुल पनाग, बंदी नवऱ्याच्या सुटकेसाठी शेकडो मैल दूर येउन ज्याच्या खुनाचा आरोप आहे त्याच्या विधवेस मदतीचे सांगाडे घालणारी, या दोघींची फुलणारी मैत्री आणि गुलचा आयेशावरचा प्रभाव यामुळे घरात आणि गावात उठणाऱ्या तरंगांना दोघींनी दिलेला प्रतिसाद.
फ़िजां मधली करिष्मा - तिचा हा एकच सिनेमा मी पाहिलाय -- दिसतेही छान आणि व्यक्तिरेखा ही मस्त. करीना असोका मध्ये मादक दिसते, जब वी ची गीत ही छान.
बेंड इट लाईक बेकहम मधल्या दोघी, कायरा नाईटली ने dangerous method मध्ये ही खूप छान काम केले आहे.
गुजारीश आणि जोधा अकबर मधली ऐश्वर्या -इतका तरल प्रेमानुभव डोळ्यातून व्यक्त केला आहे.
बर्फी मधली प्रियांका चोप्रा -- आणि Black मधली राणी मुखर्जी, सदमामधली श्रीदेवी --त्या भूमिकांचे सोने केले आहे
The Artist मध्ये Peppy Miller ची भूमिका करणारी Bejo - मूक अभिनयात अप्रतिम
Matrix ची Trinity, Constant Gardner ची Tessa, Iron Lady मधली मेरिल स्ट्रीप
चक दे मधली कोमल, बंटी और बबली मधली राणी, लज्जा मधली माधुरी -- बंडखोर आणि धमाल जगणाऱ्या या व्यक्तिरेखा फारच आवडतात.
तलाश मध्ये मुलगा गमावलेली आणि नवऱ्याचे वागणे समजाऊन घेत नव्या अनुभवास सामोरी जाणारी राणी मुखर्जी
धोबी घाटमध्ये उत्तर प्रदेशातून आलेल्या आणि मुंबईत एकट्या पडलेल्या मुलीच्या दृष्टीकोनातून मुंबई रंगवणारी यास्मीन - कीर्ती मल्होत्रा
जाने तू न जाने ना - मधली रतना पाठक -- माझ्या खूप फेमिनीस्ट मैत्रिणींची आठवण करून देणारी -- काय जेवूयात मग scrambled egg on toast -- सिंगल मदर घरातील ओळखीचा प्रसंग वाटला, वर वर hilarious वाटणाऱ्या अनेक प्रसंगातून आपल्या मुलाला वेगळे बनवण्याची- स्वतःची तत्वे, मुल्ये आपल्या मुलास देण्याची तिची धडपड सुरेख होती. इम्रानने रंगवलेल्या त्या भूमिकेत हुशार आणि EQ ने काम करणारी अशा सिंगल मदरची मुले मला तरी आठवली होती.
No comments:
Post a Comment